Friday, April 14, 2017

ती...


हि कविता माझ्या मुलींना समर्पित केलेली आहे,
माझी भविष्यातील स्वप्न मी त्यांच्यामध्ये पाहतो.
आशा करतो, तुम्हालाही नक्की आवडेल😃

ती येते...
आणि आयुष्याची गणितं पुन्हा एकदा नव्यानं मांडावी लागतात..
रोजच्या आखलेल्या वेळा अनेकदा चुकवाव्या लागतात...
या नव्या मांडणीत हळूहळू सरावलेपण येतं,
एकमेकांना सावरत दोघांना आणखी जवळ आणतं...
रात्रीची जागरनं, उशिरा जेवणं मग सवयीचं होऊन जातं,
तू झोप, मी झोका देतो, असं हळूच एक मन दुसऱ्याला सांगतं..
तिचं रडणं जीव कासावीस करतं, तर तिचं हसणं
आनंदाला उधाण आणतं...
संसाराच्या वृक्षाला जेव्हा ही नवी पालवी फुटते, त्या इवल्या इवल्या कोंबाची मग हळूच फांदी बनते...
आपल्या लाडक्या लेकींच्या आई बापांसाठी ☺

विकास पवार

Thursday, April 13, 2017

पाऊस


मित्रांनो,
आजचा विचार होता:

"Shower from sky,
quenches the thirst,
of mother nature,
Surviving every creature..."

वरील विचाराचा स्वैर अनुवाद असा आहे:
"आकाशातून पडणारा पाऊस आपल्या निसर्गदेवतेची तहान शमावतो, जी प्रत्येक जीवाला सांभाळते.."

तर मित्रांनो, आपल्या पृथ्वीतलावर सर्वांचं जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस हा पाण्याचा  सर्वोत्कृष्ट स्रोत आहे. आपलं पालनपोषण हे पावसाच्या पाण्यावरच होत असतं. अशा या पावसाचं आपण ऋणी असायला हवं आणि तो जरी निसर्ग चक्रावर अवलंबून असेल, तरी त्यापासून मिळणारं पाणी हे जपून वापरायला हवं.
म्हणूनच तर म्हटलं आहे: "पाणी म्हणजे जीवन"

धन्यवाद!
विकास पवार

Wednesday, April 12, 2017

मी लिहिलेल्या Quotes

मित्रांनो,
काही दिवसांपासून मी एक नव्या उपक्रमात सामील झालो आहे, तो म्हणजे काव्यलेखन☺
अहो, चक्क कविता करू लागलोय.
त्याही, हिंदी, उर्दू, मराठी आणि इंग्रजी मध्ये!
आता तुम्ही म्हणाल, यात काय विषेश? जगामध्ये लाखो लोक लिहीत असतील!
हो, पण आपण स्वतः जेव्हा एखादं सृजनात्मक काम करायला लागतो, तेव्हा खूप छान वाटतं.
आता पहा ना, आपण एखादया फळाची बी कुंडीमध्ये सहज टाकतो; आणि काही दिवसांमध्ये तिथे एक इवलासा कोंब फुटतो.
किती आनंद होतो तो पाहून...
तसाच अनुभव सध्या घेत आहे.पण मी ज्या एकेरी, दुहेरी, चारोळी लिहिल्या आहेत, त्यांचं थोडं विश्लेषण मी या ब्लॉग मध्ये करेल.
तूर्तास एवढं पुरे....
भेटूया लवकरच,

आपला मित्र,

विकास पवार

Friday, August 14, 2009

hi friends...

hi friends. i am vikas pawar from Mumbai. i am here to share my thoughts with you. you can visit my page for marathi kavita, lalit lekhan & many more things , which i am going to add very soon...

so keep blogging...